मंत्रिमंडळ विस्तारात सतराशे विघ्न; मुहुर्त लागेनाच, CM शिंदेंनी पदभार वाटला!

मुंबई  : राज्यात अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार पूर्णपणे झालेला नाही. राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन सहा महिने होत आले, पण तरीही विस्तार झालेला नाही. आता हा विस्तार आणखी लांबण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.राज्याच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशाही काही बातम्या समोर येत होत्या. मात्र आता तोही मुहुर्त हुकणार असं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडच्या काही खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे -
  • परिवहन, सार्वजनिक बांधकाम - शंभूराजे देसाई

  • माहिती तंत्रज्ञान - उदय सामंत

  • सामाजिक न्याय - संजय राठोड

  • मृदा व जलसंधारण - तानाजी सावंत

  • अल्पसंख्यांक विकास - अब्दुल सत्तार

  • पर्यावरण, सामान्य प्रशासन - दीपक केसरकर

  • मदत व पुनर्वसन - संदीपान भुमरे

  • माहिती जनसंपर्क - गुलाबराव पाटील

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने