17.50 कोटी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या पठ्ठ्याने दोन दिवसातच दाखवून दिला दम

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने आयपीएल लिलाव 2023 मध्ये 17.50 कोटी रूपये बोली लावात आपल्या गोटात खेचले. आता याच कॅमेरून ग्रीनने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे दिवस - रात्र कसोटीत आपला दम दाखवून दिला. लिलावाला अवघे दोन दिवस उलटत नाहीत तोच ग्रीनने आपल्यावर मुंबई इंडियन्सने उगाचच 17.50 कोटींची बोली लावली नसल्याचे सिद्ध करून दाखवले.ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी आज मेलबर्न येथे सुरू झाली. ही दिवस रात्र कसोटी असून ती गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येत आहे. या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलांड, कॅमेरून ग्रीन आणि स्टार्क यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेची अवस्था 5 बाद 67 अशी केली.
मात्र यानंतर कायल व्हेरेयेने आणि मार्को जेनसेनने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरत संघाला 179 धावांपर्यंत पोहचवले. मार्को जेनसेन आणि व्हेरेयेनेने सहाव्या विकेटसाठी 112 धावांची झुंजार भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने तोडली. त्याने व्हेरेयेने 52 धावांवर बाद केले. त्यानंतर मार्को जेनसेनचा देखील अडसर दूर केला. जेनसेनने 59 धावांचे योगदान दिले होते. यानंतर कॅमेरून ग्रीनने रबाडाला 4 तर एन्गिडीला 2 दावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 189 मध्ये गुंडाळला. ग्रीनने भेदक मारा करत आफ्रिकेची अवस्था 5 बाद 179 वरून सर्वबाद 189 धावा अशी केली. आफ्रिकेने अवघ्या 10 धावात 5 फलंदाज गमावले. त्यातील 4 फलंदाज एकट्या ग्रीनने बाद केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने