अमेरिकेची मदत म्हणजे दान नव्हे; व्होलोदिमीर झेलेन्स्की

वॉशिंग्टन :‘‘रशियाच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने केलेली अब्जावधी डॉलरची मदत म्हणजे दान नव्हे तर जागतिक सुरक्षेसाठीची गुंतवणूक आहे,’’ असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी (ता.२२) स्पष्ट केले.रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर झेलेन्स्की काल प्रथमच युक्रेनमधून बाहेर पडले. युद्धकाळातील त्यांना हा पहिला अमेरिका दौरा केला. वॉशिंग्टनमध्ये त्यांचे नायकाप्रमाणे स्वागत झाले. व्‍हाईट हाउसमध्ये अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यांचे स्वागत केले. तेथे या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली.रशियाविरोधात युक्रेनची बचावफळी मजबूत करण्यासाठी आणि हल्ले परतवून लावण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला १.८ अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा यावेळी केली. याअंतर्गत उच्च तंत्रज्ञानयुक्त पॅट्रियट्स क्षेपणास्त्र प्रणाली पुरविण्यास मान्यता दिली. युक्रेनला नव्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीसह अमेरिकेचा पूर्ण समर्थन मिळाले आहे.उभे राहून मानवंदना

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन ३०० दिवस झाले आहेत. या काळात संपूर्ण काळात झेलेन्स्की हे खाकी रंगाच्या कपड्यांत कायम दिसले आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह)कनिष्ठ सभागृहात बोलतानाही ते याच वेशभूषेत होते. मोठ्या संख्येने उपस्थितीत असलेल्या या सभागृहात झेलेन्स्की यांचे आगमन होतात सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.द्वीपक्षीय आधारावर युक्रेनला पाठिंबा अमेरिकेचा पाठिंबा कायम मिळत राहील, अशी आशा झेलेन्स्की यांनी यावेळी व्यक्त केली. या सभागृहात ३ जानेवारीला विरोधी रिपब्लिकन पक्ष बहुमतात येणार असून युक्रेनला एवढी मदत करण्याबद्दल रिपब्लिकन सदस्यांनी शंका व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर झेलेन्स्कींचे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.


अमेरिकेचे भक्कम नेतृत्व

झेलेन्स्की म्हणाले, की आमच्या शांततेच्या प्रयत्नांना बायडेन यांनी पाठिंबा दिल्याने मला आनंद वाटत आहे. अमेरिकेचे दोन सभागृह आणि द्विपक्षीय नेतृत्व हे भक्कम राहील यासाठी तुम्ही महिला आणि सज्जन कायम सहकार्य करीत आला आहे, याचाही मला अभिमान वाटत आहे.

रशियासमोर झुकणार नाही

ते म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात (काँग्रेस) उपस्थित राहण्याची आणि येथील सदस्य आणि सर्व अमेरिकी नागरिकांशी बोलण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी सन्मानजनक आहे. तुमचा पैसा हा दान नसून जागतिक सुरक्षा आणि लोकशाहीसाठी एक गुंतवणूक आहे.’’ कितीही विनाशकारी आणि अंधकारमय परिस्थिती निर्माण झाली तरी युक्रेन माघार घेणार नाही. युक्रेन कायम जीवित राहून लढेल. जगाच्यादृष्टिने आम्ही रशियाचा पराभव केला आहे.’’ रशियासमोर युक्रेन कधीही झुकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

तुम्ही एकटे पडणार नाहीत

संयुक्त पत्रकार परिषदेत झेलेन्स्की यांना दिलासा देताना बायडेन म्हणाले, ‘‘तुम्ही कधीच एकटे पडणार नाहीत. अमेरिकेची जनता प्रत्येक पावलावर तुमच्या बरोबर आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. युक्रेनची लढाई ही मोठ्या युद्धाचा एक भाग आहे, असे अमेरिकेची भावना आहे. स्वातंत्र्यतेची ज्योत आपण तेवत ठेवू आणि प्रकाश कायम ठेवून अंधारावर विजय मिळवू’’ न्यायावर आधारित शांततेचा पुरस्कार करीत रशियाबरोबर कोणतीही तडजोड न करण्याचा निश्‍चय दोन्ही नेत्यांनी केला. झेलेन्स्की म्हणाले, की अध्यक्ष या नात्याने माझ्यासाठी शांती, माझ्या देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अखंडत्व महत्त्वाचे आहे.नव्या शस्त्रांच्या पुरवठ्याने संघर्षाची ठिणगी प्रखर होईल आणि तो युक्रेनसाठी शुभसंकेत नसेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने