श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला? नार्को चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे

दिल्ली:  वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने देश हादरला आहे. तिचा प्रिय आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून केला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते मेहरोलीतील जंगलात फेकून दिले होते. तब्बल सहा महिन्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता श्रद्धा वालकर खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे.

श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर दिल्लीतील पोलिसांनी आफताबला अटक करत चौकशी सुरु केली आहे. सध्या आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यात येत आहे. नार्को चाचणीत आफताबने धक्कादायक खुलासे केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी चायनीज चॉपरचा वापर केला होता. त्याप्रमाणे हातोडा, खिळे आणि करवत वापरल्याचाही खुलासा आफताबने केला आहे. यापूर्वी पोलिसांनी एक करवत आणि आणि चाकू पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटवरून जप्त केलं आहे.
नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीतील आफताबने दिलेली उत्तर एकसारखीच आहेत. पण, पॉलिग्राफ चाचणीवेळी आफताबला उत्तरातील विरोधीभासाबद्दल विचारले असता त्याने सांगितलं की, सहा महिन्यांपूर्वी श्रद्धाची हत्या केली होती. त्यामुळे काही गोष्टी आठवत नाहीत. तसेच, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या ठिकाणी फेकल्याचा दावा आफताबने केला होता, त्या ठिकाणांबाबात नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीत एकच उत्तर मिळालं आहे. श्रद्धाचा मोबाईल फोन मिरा-भाईंदरच्या खाडीत फेकल्याचंही आफताबने म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने