“स्त्रीप्रधान चित्रपटांना इथे नेहमीच…” तापसी पन्नूने बॉलिवूडबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

मुंबई: तापसी पन्नूने तिच्या अभिनयाने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामुख्याने स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. पण त्या चित्रपटांना अपयश आलं. आता यावर तिने भाष्य केलं आहे.यावर्षी तापसी ‘दोबारा’ आणि ‘शाबाश मिठू’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण तिचे हे दोन्ही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. या चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी त्यांना चित्रपटगृहात मोठ्या संख्येने स्क्रीन्स मिळायला अनेक अडचणी आल्या. पण एका स्त्रीप्रधान चित्रपटाला स्क्रीन्स मिळण्यात दरवेळी अडचणी येतात, अशी खंत तिने व्यक्त केली.तापसी म्हणाली, “माझा चित्रपट जेव्हा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला इतर स्टार्सच्या तुलनेत कमी स्क्रीन मिळाले आहेत. मोठा स्टार असो की छोटा स्टार, जास्त स्क्रीन्स मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पूर्वी खूप वाईट वाटायचे. पण आता मला वाईट वाटत नाही. आता मी लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक दिवस मी त्या बाबतीत यशस्वी होईल आशा आहे. प्रेक्षक नक्कीच स्त्रीप्रधान चित्रपटांना प्राधान्य देतील.”दरम्यान आता तापसी लवकरच ‘ब्लर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी ‘झी5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने