आता पंतप्रधान अन् केंद्र सरकारचा आशीर्वाद हवा; विजयानंतर केजरीवालांचं विधान

दिल्ली: दिल्ली एमसीडी निवडणुकीतील विजयानंतर आम आदमी पक्षाच्या विजयानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. एवढा मोठा आणि बदल घडवणाऱ्या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन. आतापर्यंत जनतेने जी जबाबदारी दिली, ते म्हणजे शाळा, रुग्णालय, वीज समस्या आम्ही सगळ ठीक केलं. आता दिल्लीकरांनी साफ-सफाई करण्याची, पार्क ठिक करण्याची जबाबदारी दिल्याचं केजरीवाल म्हणाले.सर्वच पक्षांच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना केजरीवाल म्हणाले की, आता आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. मी सर्व पक्षांच्या उमेदवारांना आवाहन करतो की, राजकारण आजपर्यंतच होते. आता आपल्याला दिल्ली ठिक करायची आहे, त्यासाठी मला भाजप आणि काँग्रेसचे सहकार्य हवे आहे. आम्हालाही केंद्र सरकारचे सहकार्य हवे आहे. दिल्ली ठिक करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवेत. जे २५० नगरसेवक विजयी झाले ते कोणत्याही पक्षाचे नाहीत, ते दिल्लीतील नगरसेवक आहेत, असंही केजरीवाल म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "आता आम्ही दोन कोटी लोक मिळून दिल्ली स्वच्छ करू. आता आपल्याला दिल्ली सरकारप्रमाणेच भ्रष्टाचार दूर करावा लागेल. काहींना वाटत की काम केलं तर मतं मिळत नाहीत. मतांसाठी अपशब्द वापरावे लागतात, असंही काहींना वाटत. पण आम्हाला ते करण्याची गरज नाही. नकारात्मक राजकारण करू नका. आज दिल्लीच्या जनतेने संपूर्ण देशाला एक संदेश दिला आहे की, शाळा आणि हॉस्पिटलमुळे मतं मिळतात.'सकारात्मक राजकारण वाढल की, देश नंबर वन होईल. मला सर्वांना सांगायचे आहे की, उद्धटपणा करू नका. जर आपल्यात अहंकार असेल तर देव आपल्याला कधीही माफ करणार नाही, असंही केजरीवाल म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने