मला चार मुलं होण्यामागे काँग्रेसचा हात; BJP MPच्या वक्त्यावरून

मुंबई : काँग्रेस देशात सत्तेत असताना त्यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर मी आज चार मुलांचा बाप नसतो असं वक्तव्य भाजपचे खासदार रवी किशन यांनी केलं आहे. आपल्या चार अपत्यांचा ठपका त्यांनी काँग्रेसवर ठेवल्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. तर ट्वीटरवर त्यांना ट्रोल करणाऱ्या मीम्सचा पाऊस पडत आहे.दरम्यान, रवी किशन यांनी आपल्याला मुलगा होईपर्यंत मुले होऊ दिली आणि त्याचा ठपका काँग्रेसवर ठेवला अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर त्यांनी आपल्या पत्नीची सार्वजनिकरित्या बॉडी शेमिंग केली असल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे.दरम्यान, लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर सध्या देशभरात चर्चा सुरू असून समान नागरी कायद्याने संसदेत प्रवेश केला आहे. तर राज्यसभेत हे विधेयक सादर करून घेतले आहे. त्यामुळे सध्या हा विषय जोरदार चर्चेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने