मतमोजणी केंद्रातच काँग्रेस उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न; EVM मध्ये बिघाड झाल्याचा आरोप

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला असून हळूहळू इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. राज्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे, तर आम आदमी पक्षाला 10 टक्क्यांहून अधिक मतं मिळताना दिसत आहेत.गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपचे सर्व दिग्गज नेते आघाडीवर असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कच्छच्या गांधीधाममधील काँग्रेस उमेदवारानं मतमोजणी केंद्रात गळ्यात फास बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.भरत सोळंकी यांनी ईव्हीएम नीट सील केलं नसून काहींच्या सह्या त्यावर नसल्याचा आरोप केलाय. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवारानं केंद्राबाहेर धरणे आंदोलन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने