भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कॉंग्रेसची नेत्यांना मोठी ऑफर

दिल्ली :देशभरात कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सर्व नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. राजकीय वर्तुळात सध्या कॉंग्रेसने काढलेल्या नव्या फतव्याची चर्चा जोरदार रंगली आहे.राहुल गांधी नुकतेचं हरियाणात पोहचले आहेत. यानिमित्त कॉंग्रेसकडून नवीन आदेशवजा सूचना काढण्यात आली आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
तर आमदारकी अन् मंत्रीपद मिळेल

काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्याला महिन्यातून एकदा १५ किलोमीटर चालणं अनिवार्य असणार आहेत. तसेच २६ किंवा २७ जानेवारीपासून महिन्यातून एक दिवस पदयात्रेत चालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.जर कुणाला काँग्रेसमध्ये काम करायचं असेल, पद हवं असेल, आमदार,मंत्री राहायचं असेल तर त्यांना पदयात्रेत १५ किलोमीटर चालावं लागेल. महिन्यातील एक दिवस त्यांना गावातील लोकांबरोबर पदयात्रेत चालावं लागेल हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत असेही राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले आहे.

भारत जोडो यात्रा थांबविण्याची मागणी

जगभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. यापार्श्वभूमिवर भारत जोडो यात्रा थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात पत्रदेखील राहुल गांधी यांना पाठविले आहे. या पत्रात कोरोनाचे कारण दिले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची तक्रार राजस्थानमधील भाजपच्या तीन खासदारांनी केंद्राकडे केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने