अर्जेंटिनाला फिफा वर्ल्डकपचं सेलिब्रेशन भोवणार; कोरोना रूग्ण 130 टक्क्यांनी वाढले

अर्जेंटिना: अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर फिफा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. यानंतर अर्जेंटिनाच्या विविध शहरात वर्ल्डकप विजयानंतर जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे. शहराच्या मुख्य चौकात लोकांनी तुफान गर्दी केली आहे. याचबरोबर विश्वविजेत्या संघाचे राजधानीतून मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी देखील लाखो लोक रस्त्यावर एकत्र जमले होते.मात्र याचा फटका अर्जेंटिनाला मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या आठवड्याभरात अर्जेंटिनामध्ये कोरोना केसेस तब्बल 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्जेंटिनामध्ये आतापर्यंत 98 लाख 29 हजार 236 कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर 1 लाख 30 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.कोरोना रूग्णसंख्येवर नजर ठेवणाऱ्या वल्डोमीटर संस्थेनुसार अर्जेंटिनामध्ये गेल्या 7 दिवसात कोरोना रूग्णसंख्या 62 हजार 261 वर पोहचली आहे. तर 39 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या अर्जेंटिनात 1 लाख 1 हजार 989 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4 - 2 असे पराभूत केले. तेव्हापासून अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते. याची दृष्ये सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. वर्ल्डकप विजयानंतर ब्यूनस आयर्सच्या रस्त्यावर जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त लोक जमा झाले होते. यावेळी संघाची बसमधून मिरवणूक देखील काढण्यात आली. मात्र लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने संघाला एअरलिफ्ट करून बाहेर काढावे लागले.

जगभरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतेय

गेल्या सात दिवसात जगभरात एकूण 36 लाख 32 हजार 109 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. जपानमध्ये जवळापास 10 लाख 55 हजार 578 कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर दक्षिण कोरियामध्ये 4 लाख 60 हजार 766, फ्रान्समध्ये 3 लाख 84 हजार 184, ब्राझीलमध्ये 2 लाख 84 हजार 200, अमेरिकेत 2 लाख 72 हजार 075, जर्मनीत 2 लाख 23 हजार 227, हाँगकाँगमध्ये 1 लाख 08 हजार 577 तर तैवानमध्ये 1 लाध 07 हजार 381 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. चीनमध्ये तर लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे. याचबरोबर मोठमोठ्या स्टेडियमचे रूपांतर रूग्णालयात करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने