चीनचा व्हेरिएंट येतोय ; नागरिकांनो घाबरू नका; काय म्हणाले डॉ. रवी गोडसे

मुंबई: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत अनेक देशांनी सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.भारत सरकारकडूनही याबाबत सावध भूमिका घेत उच्चस्तरीय बैठका घेतल्या जात आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅन्डम कोरोना टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.दरम्यान, चीनमधील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वा भितीच्या वातावरणात डॉ. रवी गोडसेंनी डिजिटल सकाळशी बोलताना नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.गोडसे म्हणाले की, चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढतीये हे खरं आहे. मात्र, तीन वर्षांनंतर अचानक निर्बंध उठवल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या वाढणार होतीच हे सर्वज्ञात होते. मात्र, चीनमधील वाढत्या रूग्णसंख्याचा भारतात काहीही परिणाम होणार नसल्याचेही गोडसे म्हणाले.

चीनमध्ये नागरिकांना लागण होत असलेला कोरोनाचा हा व्हेरिएंट कोणताही नवा व्हेरिएंट नसून, जुन्यालाच नवीन असल्याचा भासवण्याचा केविलवाणा प्रकार आहे. कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचा यापूर्वीच्या व्हेरिएंट इतका धोकादायक नाहीये. या व्हेरिएंटची लागण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यामुळे एखाद्याला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ अजिबात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही.चीनमधील बाधितांमुळे नव्या भयानक व्हेरिएंटी निर्मिती झाली तरी तो रौद्ररूप धारण करणार नाही. कारण, यापूर्वी अनेकांना ओमिक्रॉनची लागण होऊन गेलेली आहे. तोच ओमिक्रॉन लसीप्रमाणे काम करेल, यापूर्वी ऑमिक्रॉन व्हेरिएंट भारतासाठी वरदान ठरेल असे मी सांगितले होते आणि यावेळी त्याचाच फायदा भारतीयांना होणार आहे. त्यामुवळे नागरिकांना काळजी करू नये. मात्र खबरदारी घेतली तर उत्तम.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने