मुलांना कफ सिरप देताय? सावध व्हा! हेच कफ सिप चिमुरड्यासाठी ठरलं जीवघेणं

मुंबई: लहान मुलांना सर्दी ताप आला की डॉक्टर कफ सिरप द्यायला सांगतात. कारण कडू औषधे खायला मुलांना अजिबात आवडत नाही. मात्र तुम्ही कफ सिरफ मुलांना देताना डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घ्यायला हवा. कारण मुंबईत कफ सिरप प्यायल्याने एका दीड वर्षाच्या मुलाच्या हृदयाचे ठोके बंद पडले आहेत.20 महिन्यांच्या या लहान मुलाला सर्दी आणि ताप आला त्यामुळे त्याच्या आईनं डॉक्टरांना न विचारताच त्याला एक सिरप दिलं. कफ सिरप पिल्यानंतर 20 मिनिटातच हा मुलगा अचानक खाली पडला आणि त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले. इतकंच नाही तर हा चिमुरडा श्वासही घेऊ शकत नव्हता. त्याला तातडीने रूग्णालयात नेले त्यामुळे त्याचा सुदैवाने जीव वाचला.या चिमुरड्याच्या जिवावर बेतल्यानंतर आता त्या क्षेत्रातील अनेक पालक सावध झाले आहेत. तेव्हा तुमच्या मुलांना कफ सिरप देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्यायलाच हवा.लहान मुलांसाठी कफ सिरप का घातक ठरते?

  • 6 वर्षापेक्षा लहान मुलांना कोडीन असणारी कफ सिरप जास्त वेळा दिली तर ते आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा ते देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • कोडीनयुक्त कफ सिरपमधील अँटीहिस्टामाईन लहान मुलांसाठी घातक ठरु शकतं.

  • कोडीनयुक्त सिरपमुळे लहान मुलांचे हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते.

  • कोडीनयुक्त सिरपमुळे बाळांना सुस्ती येऊ शकते.

  • कोडीन केमिकल अफीमशी संबंधित असतं.

  • कोडीनच्या अतिसेवनामुळे डिप्रेशन, झोप न येणं, भूक न लागणं, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात.

सध्या हिवाळ्यात मुलांना सर्दी खोकला मोठ्या प्रमाणात उद्भवतो. तेव्हा सर्दी खोकल्यापासून मुलांचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांना न विचारता मुलांना कफ सिरप देऊ नका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने