'मस्का' लावणाऱ्या युजर्सना 'एलॉन'चं वेसण; तुमचे फॉलोअर्स ढासळणार

नवी दिल्लीः एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. सुरुवातीलाच अनेक कर्मचाऱ्यांवर गंडांतर आलेलं. शिवाय फेक अकाऊंटवर कारवाई करण्यात आली. आता युजर्सचे फॉलोअर्स घटणार आहेत.ट्विवर सध्या बरीच बनावट खाती बंद करणार आहे. स्पॅम आणि स्कॅम खाती साफ करत आहोत, असं मस्क यांनी आज ट्विट करुन सांगितलं. त्यामुळे अनेकांच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येईल.ट्विटर ब्लूसाठी यूजर्सला पैसे द्यावे लागणार आहेत. भारतात ट्विटर ब्लूची किंमत ७२० रुपये असू शकते. अमेरिका व इतर देशांमध्ये यासाठी ८ डॉलर्स मोजावे लागतील. नवीन सर्व्हिस व्यतिरिक्त व्हर्च्यूअल जेलवर देखील काम सुरू आहे. रिपोर्टनुसार, यूजर्सने ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्यास व्हर्च्यूअल जेल होईल. या अंतर्गत यूजर्सला प्लॅटफॉर्मवर कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी करावी लागणार नाही.
'ब्लू टिक'चा रंग बदलणार

ट्विटरवर कंपन्यांसाठी गोल्ड चेक मार्क, सरकारसाठी ग्रे आणि सर्वसामान्य यूजर्ससाठी ब्लू टिक मार्क जारी केले जाईले. तसेच, सर्व व्हेरिफाइड अकाउंटचे पुन्हा व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. याआधी ट्विटरवर राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सेलिब्रेटींची ओळख पटावी यासाठी ब्लू टिक जारी केले जात असे. Twitter Blue ला पुन्हा सुरू करण्यास उशीर होत असल्याबाबत मस्क यांनी माफी देखील मागितली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने