उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था बनणार देशात नंबर एक; CM योगींचा दावा

उत्तर प्रदेश: गुन्हेगारी आणि गुंडगिरीला उत्तर प्रदेशात स्थान नाही. यामुळे उत्तर प्रदेश ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत असून आगामी काळात उत्तर प्रदेश देशाची प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. सध्या उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. मुरादाबाद शहरातील दिल्ली रोडवरील बुद्ध विहार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रबुद्ध जन संमेलनाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, मुरादाबादमध्ये विकास वेगाने होत आहे. आज येथे 424 कोटी रुपयांच्या 30 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत आहे. मुरादाबादला सुरक्षित शहर बनवले जात आहे.मुरादाबादमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत 37,000 गरीब लोकांना थेट लाभ मिळाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत राज्यातील नऊ लाख विक्रेत्यांना बिनव्याजी रोजगारासाठी कर्ज देण्यात आले आहे.भाजपचे सरकार आल्यानंतर मुरादाबादच्या उद्योगांना गती मिळाली आहे. राज्यात सपाचे सरकार असताना स्मार्ट सिटी, अमृत योजनेसह सर्वच उद्योगांमध्ये अडथळे आले होते. पण साडेपाच वर्षांच्या भाजपच्या डबल इंजिन सरकारने विकासाचे आणि उद्योगाचे सर्व मार्ग खुले केले आहेत. सुरक्षा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सुरक्षेच्या बाबतीतही राज्य प्रथम क्रमांकावर जाणार आहे. राज्याला उद्योगात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मी निर्यातदारांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.

उत्तरप्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 चे आयोजन करणार आहे. यामध्ये जगभरातील उद्योजक गुंतवणूक योजनांसह सहभागी होतील. त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अशाच प्रयत्नांमुळे आणि तुमच्या सहकार्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्यात यूपी आघाडीवर असेल. असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने