बारावी उत्तीर्णांना सीआरपीएफमध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार ९२ हजार

मुंबई : केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलच्या पदांवर भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण १ हजार ४५८ पदे भरण्यात येणार आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवार www.crpfindia.com या वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे – १,४५८

सहाय्यक उपनिरीक्षक - १४३ पदे

हेड कॉन्स्टेबल - १३१५ पदे

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - ४ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जानेवारी २०२३
शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे १२वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेचे समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

पगार

सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन पातळी ५ नुसार २९,२०० ते ९२,३०० रुपये दिले जातील. दुसरीकडे, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन पातळी ४ नुसार २५,५०० ते ८१,१०० रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणी, OBC श्रेणी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर एससी, एसटी आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने