स्पर्धकांच्या भावनांचा बांध फुटला.. घरच्यांना पाहून सगळेच..

मुंबई: तरुणपणात हाल काढले, उमेदीच्या काळात 16 कोटींचे नुकसान झाले.. बिग बॉस मराठीच्या खेळाला सुरुवात होऊन आता 80 दिवसांचा टप्पा गाठट आला आहे. दिवसेंदिवस हा खेळ अत्यंत रंजक होत चालला आहे. आजवर आपण राडा, भांडण, वाद सगळच अनुभवलं. स्पर्धक हा खेळ जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन स्वतःला सिद्ध करत आहेत. पण आज बिग बॉसच्या घरात एक भावनिक क्षण येणार आहे. एरव्ही कचाकचा भांडणारे स्पर्धक आज धायमोकळून रडताना दिसणार आहे.बिग बॉस च्या घरातील एक सर्वात हळवा प्रसंग म्हणजे जेव्हा स्पर्धकांना त्यांचे घरचे भेटायला येतात. दरवर्षी बिग बॉस च्या खेळात हा शिरस्ता कायम असतो ज्याची घरचे स्पर्धक आणि प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत असतात. 80 दिवस घरच्यांच्या संपर्काशिवाय राहणाऱ्या या स्पर्धकांना शेवटच्या काही आठवड्यात काही क्षणासाठी आपल्या घरच्यांना भेटायची संधी मिळते. बऱ्याचदा स्पर्धक आणि पालकांमध्ये असलेले वाद देखील या निमित्ताने समोर आल्याने हळवे अनई भावनिक प्रसंग निर्माण झाले आहेत. असाच आजचा दिवस असणार आहे. स्पर्धकांचे आई -वडील त्यांना भेटायला येणार आहेत.

नुकताच एक प्रोमो समोर आला यामध्ये आपल्या घरच्यांना पाहून सगळेच सदस्य धायमोकळून रडताना दिसले. यामध्ये अमृता धोंगडेचा एक प्रोमो सध्या विशेष व्हायरल होत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच अमृता म्हणाली होती तिच्यामध्ये आणि घरच्यांमध्ये वाद आहेत. आता अचानक तिचे आई आणि वडील समोर आल्याने ती जोरात वडिलांना हाक देऊन किंचाळते आणि रडू लागते. यावेळी तिची आई सुद्धा अमृताच्या गळ्यात पडून रडते. यावेळी पोरी आता रडायचं नाही.. लढायचं.. असा सल्ला अमृताचे वडील तिला देतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने