हिवाळी अधिवेशन नियोजित काळातच; विरोधकांची मागणी फेटाळली

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नियोजित काळातच होणार आहे.१९ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात नेत्यांचे घोटाळे, त्यांच्यावरचे आरोप प्रत्यारोप या विषयांवरच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे पडल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली.यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन ३० तारखेला म्हणजे ठरलेल्या कालावधीतच संपणार आहे. उद्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने