शरीर दाखवणारी तू.. गुरुचरित्रावर बोलायची तुझी लायकी नाही.. अमृता झाली ट्रोल..

मुंबई: कलाकार आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट देण्यासाठी आणि चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशलमिडियावर प्रचंड सक्रिय असतात. पण बऱ्याचदा नेटकरी अत्यंत खालच्या पातळीवर जावून कलाकारांनं ट्रोल करत असतात. असाच अनुभव अभिनेत्री अमृता खालविलकरला आला आहे. अक्षरशः पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ तिच्यावर आली आहे.सध्या अभिनेत्री अमृता खालविलकरची जोरदार हवा आहे. एकामागोमाग एक केलेले दर्जेदार प्रोजेक्ट आणि बॉलीवुडमधला वावर यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे. 'चंद्रमुखी' या चित्रपटाने तिला वेगळीच ओळख मिळवून दिली. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटातूनही ती झळकली. विशेष म्हणजे हिंदीतील 'झलक दिखला जा' या डान्स शो मध्ये अमृताचा डान्स पाहून बॉलीवुडही तिच्यावर फिदा झाले. पण आज अमृता जरा अडचणीत सापडली आहे. तिच्या फेसबूक पोस्टवर एका नेटकऱ्याने पातळी सोडून प्रतिक्रिया दिल्याने थेट पोलिसात जाऊन तक्रार करण्याची तंबी अमृताने त्या नेटकऱ्याला दिली आहे.अमृता खानविलकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने गुरुचरित्रातील काही ओळी शेअर केल्या आहेत. ''दोन वर्णाचा ‘गुरु’ हा शब्द चारी पुरुषार्थाची प्राप्ती करुन देणारा आहे. गुरु हाच माता व पिता आहे. तसाच परम शिव आहे. शिव कोपला तर त्याचे रक्षण करु शकणार नाही. ईश्वर प्रसन्न झाला तर त्याची ओळख पटविणेसाठी गुरु पाहिजे पण गुरु प्रसन्न असलेस ईश्वर त्याचे अधीन असतो. गुरु कुठेही शास्त्राचा अर्थ, तीर्थे, व्रते, योग, तप आदिचे ज्ञान प्राप्त होते,'' असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमृताच्या या पोस्टवरवर एका नेटकऱ्याने अक्षरशः मर्यादा सोडून कमेंट केली आहे. “गुरुचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची. शरीर दाखवणाऱ्यांनी याबाबत बोलू नये.” अशी कमेंट त्या व्यक्तीने केली आहे. त्यावर अमृतानेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.यावर अत्यंत संताप अमृताने व्यक्त केला आहे. “कोण तुम्ही? अशा भाषेत परत बोललात तर पोलिसात तक्रार करेन कळलं? याबाबतीत कोणाचं उगाचच ऐकून घेणार नाही”, असे ती त्यंत परखडपणे बोलली आहे. तिच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने