दीपिकाची 'भगवी' बिकीनी तयार केली, शालीनची 'लॉटरीच' लागली! आता...

मुंबई: पठाणमधील बेशरम रंग पाहिलं नाही असं कुणी सापडणं आता अवघड आहे. असं चित्र आहे. सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरु आहे. आता तर अयोध्येतील संत परमहंसदास यांनी शाहरुखला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पठाणचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पठाण आणि त्या चित्रपटातील बेशरम गाणे याच्याशी संबंधित जोरदार वाद सुरु झाला आहे. पठाणमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगातील बिकीनी ही तर अनेकांच्या डोळ्यात खुपली आहे. त्यावरुनं हिंदू महासभा आक्रमक झाली आहे. तिकडे मध्यप्रदेशमध्ये नरोत्तम मिश्रा यांनी काहीही झालं तरी पठाण हा प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे. काही मुस्लिम संघटनांनी देखील त्यावर आक्षेप नोंदवला आहे.मात्र यासगळ्यात चाहत्यांनी शाहरुखच्या त्या चित्रपटातील गाण्याचे कौतूक केले आहे. एकतर तब्बल चार वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुखचा पठाण हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अशावेळी जगभर शाहरुखचा असलेला फॅन फॉलोअर्स लक्षात घेता पठाण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासगळ्यात आणखी एका व्यक्तीला लाईमलाईटमध्ये येण्याची मोठी संधी मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने