कडाक्याच्या थंडीत होतात सर्वाधिक अपघात! बचावासाठी 'या' लाइटचा वापर बेस्ट! अशी घ्या काळजी

मुंबई: दरवर्षी कडाक्याच्या थंडीच्या काळात बरेच अपघात होतात. थंडीमुळे भिजलेला रस्ता आणि धुके अपघातास जबाबदार ठरतात. तुमच्या गाडीचे लाइटदेखील यावेळी काम करत नाहीत. तेव्हा हिवाळ्यात गाडी चालवताना काळजी घेणे गरजेचे ठरते. अपघातापासून बचावासाठी कोणते लाइट बेस्ट आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.या काही टीप्स अपघात होण्यापासून तुमचा बचाव करेल. चला तर या काही टीप्स आपण जाणून घेऊया ज्या तुम्हाला ड्रायव्हिंग करताना उपयोगी पडेल.
१. धुक्यांमध्ये हेडलाइट्स नेहमी लो बीमवर ठेवा. असे केल्याने पुढचं वाहन दिसण्यास सोपं पडेल. तसेच गाडीची दिशा योग्य आहे की नाही ते कळण्यासही मदत होते. 

२. धुक्यांमध्ये तुम्हाला पुढलं वाहन बरोबर दिसतंय की नाही याकडे आवर्जून लक्ष ठेवा. केवळ फॉग लाइटचा वापर करू नये. कारण फॉग लाइट दूरून येणाऱ्या गाड्यांना दिसून येत नाही. तेव्हा तुमचे हेडलाइट्सही लो बीमवर ठेवा. ज्याने तुम्ही दूरवरच्या ड्रायव्हरलाही बघू शकता.

३. दुसऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करण्याची चूक करू नका. कारण धुक्यांमध्ये रस्ते ओले असतात. अशात जर तुम्ही ब्रेक मारला तर तुमची गाडी स्लिप होण्याची शक्यता असते.

४. धुक्यांमध्ये गाडी लेनमध्ये चालवा. लेनला तोडू नका. रस्त्याबाजूला असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांकडे लक्ष असावे.

५. वाटेत कोणत्याही कारणास्तव वाहन थांबवावे लागल्यास रस्त्याच्या कडेला वाहन उभे करावे. कारण तुमचे पार्किंगचे दिवे जरी चालू असले तरी धुक्यात ते दिसण्याची शक्यता कमी असते किंवा दिसायला उशीर झालेला असतो.

६. धुक्यात वाहन नेहमीपेक्षा कमी वेगाने चालवा कारण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ते सहज थांबवता येते.

७. धुक्यात फॉग दिवे वापरा. फॉग लॅम्प्सच्या मदतीने तुम्ही चांगल्याप्रकारे पुढे पाहू शकता. फॉग लॅम्पचा प्रकाश फार दूर जात नाही, परंतु विस्तृत क्षेत्र व्यापतो.

८. तुमचे वाहन आणि इतर वाहनांमध्ये निश्चित अंतर ठेवा. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक लावण्यासाठी वेळ मिळतो.

९. तलाव किंवा नदीजवळून जाताना वाहन सावकाश चालवा, दाट धुके असल्यास वाहनाचे चारही इंटीकेटर लावा.

१०. लांबच्या प्रवासात हायवेच्या बाजूला असलेल्या दुकानात वाहन उभे करायचे असल्यास त्याचे सर्व दिवे चालू करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने