'ईडीनं बारा तास बसून ठेवलं, माझ्यासारख्या व्यक्तीसोबत तर...' विजय भावूक

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा आता ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. त्याची बारा तास चौकशी ईडीकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासगळ्या प्रकरणावर विजयनं भावूक होत प्रतिक्रिया दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.असं काय झालं की, लायगर फेम विजय देवरकोंडाला ईडीनं चौकशीसाठी बोलावलं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पडला होता. त्या चित्रपटावरुनच त्याला ईडीनं ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यासगळ्यात मात्र विजयला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्यानं सांगितले आहे. त्याच्या चाहत्यांना देखील या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. लायगरमध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे होती. लायगरकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.आता ईडीनं लायगरशी संबंधित एकेका एका व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. थोड्याच दिवसांनी अनन्या पांडेला देखील नोटीस पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील सुशांत सिंग प्रकरणात अनन्या पांडेला ईडीनं चौकशीसाठी बोलावले होते. लायगरचे निर्माता चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांची देखील चौकशी करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन करन्सी पॉलिसी उल्लंघन (फेमा) केल्याप्रकरणी चित्रपटाशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे.विजयनं मात्र आपल्याला बारा तास बसवून ठेवल्याचे सांगत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूस्थान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, लोकप्रियता वाढली की त्याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी येतात. मी यासगळ्याकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहतो. हेही दिवस जातील. त्यांनी बोलावलं तेव्हा गेलो. जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली. अशी प्रतिक्रिया विजयनं दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने