अहो ऐकलं का? मी जिंकले... रविंद्र जडेजाचा चेहरा खुलला!

गुजरात : गुजरात विधानसभेची निवडणूक आणि निकाल देशभरात चर्चेचा विषय आहे. त्या निवडणूकीमध्ये भाजपनं एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. सातव्यांदा भाजपनं गुजरातमध्ये आपली सत्ता निर्विवादपणे राखली आहे.यंदाच्या निवडणूकीत चर्चा होती ती भाजपच्या रिवाबा जडेजाची. रिवाबा ही भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. काही झालं तरी पत्नीला विजयी करायचेच असा इरादा जडेजाचा होता. त्यानं तो तिला विजयी करुन सार्थ केला आहे. सध्या सोशल मीडियावर रिवाबाची चर्चा आहे. या दोन्ही सेलिब्रेटींवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.रिवाबाच्या विरोधात होतो आम आदमी पार्टीचे करसान कार्मुर. रिवाबानं जवळपास चाळीस हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. रिवाबा विजयी झाल्यानंतर मतदारांनी तिचं कौतूक केलं आहे. विजयानंतर तिनं मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी तिचा पती रविंद्र जडेचाही उपस्थित होता. रॅलीतील फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.रिवाबा तुझ्या या यशात तुझ्या पतीचा मोठा हात आहे. त्याच्याशिवाय तुझा विजय शक्य नव्हता. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रविंद्र हा रिवाबाच्या प्रचार रॅलीमध्ये सक्रियपणे दिसून आला होता. तेव्हापासूनच रिवाबासाठी ही निवडणूक सोपी झाली होती. अशीही चर्चा व्हायरल होतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने