चीननंतर आता जपानचा हा व्हायरस करेल का कहर? जाणून घ्या लक्षणे अन् उपचार

जपान: चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने अख्ख्या जगाची तारांबळ उडवली होती. आता चीननंतर जपानमधल्या इंसेफेलाइटिस वायरसच्या केसेस वाढत चालल्या आहेत. हा एक मच्छर-जनित फ्लेविव्हायरस आहे आणि डेंग्यू, पिवळा ताप आणि वेस्ट नाईल व्हायरसच्याच वंशाचा आहे. जपानी एन्सेफलायटीस व्हायरस (जेई) चे पहिले प्रकरण 1871 मध्ये जपानमध्ये नोंदवले गेले होते, म्हणून त्याला 'जपानी एन्सेफलायटीस व्हायरस' म्हणतात.

हा विषाणू भारतातील लोकांसाठी नवीन नाही. मात्र भारतात या विषाणूची प्रकरणं दुर्मिळ आहेत, परंतु एन्सेफलायटीस असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकताच पुण्यातील एका ४ वर्षाच्या मुलामध्ये हा विषाणू आढळून आला आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे सर्व वयोगटातील लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो.एका अहवालानुसार, भारतातील सुमारे 597,542,000 लोक जेई प्रभावित भागात राहतात. याशिवाय, जपानी एन्सेफलायटीस विषाणूची 1,500 ते 4,000 प्रकरणे दरवर्षी नोंदवली जातात.



जापानी इंसेफेलाइटिस चे लक्षण

CDC च्या मते, जपानी इंसेफेलाइटिस व्हायरची अनेक लश्र​जापानी इंसेफेलाइटिस के लक्षणे आहेत. मात्र सुरूवातील ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात.

  • ताप

  • दोकेदुखी

  • उलट्या होणे

  • मानसिक स्वभावात बदल

  • न्यूरोलॉजिकल लक्षणे

  • अशक्तपणा येणे

  • मूव्हमेंट डिसॉर्डर

उपचार

यावर परिपूर्ण असा उपचार नसून याच्या लक्षणांवर आधारित डॉक्टर उपचार करतात. योग्य उपचारासाठी डॉक्टर ऑबर्वेशनमध्ये ठेवतात.

डासांपासून सावध राहा

जपानी इंसेफेलाइटिसपासून बचाव करण्यासाठी डासांपासून स्वत:चा बचाव करा. त्यासाठी फूल कपडे घाला. जपानी इंसेफेलाइटिस व्हॅक्सिनचा शॉट घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने