तेजस्विनी जोमात..स्पर्धक कोमात.., लोणारीची वाईल्ड कार्ड एन्ट्री?

मुंबई:  बिग बॉस मराठी ४ आता हळूहळू त्याच्या उत्तरार्धाकडे प्रवास करत आहे. घरात सात सदस्य उरले होते. ज्यातील दोन म्हणजे राखी सावंत आणि आरोह हे वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं घरात प्रवेश केलेेले सदस्य आहेत. सध्या राखीचाच धुमाकूळ घरात दिसत आहे. तर बाकी घरातील सदस्य थोडे थंड पडलेले दिसतायत. त्यामुळेच की काय आता बिग बॉस मराठीत पुन्हा एक वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा निर्णय घेतला गेलाय अशी चर्चा रंगलीय.

यासंबंधित नव्या प्रोमोला पाहून सोशल मीडियावर नेटकरी हैराण तर झालेयत पण खूश झाल्याचं चित्रही दिसत आहे. कारण त्या प्रोमोत स्पष्ट दिसत आहे की,हाताला दुखापत झाल्यानं घराच्या बाहेर जिला जायला लागलं त्या तेजस्विनी लोणारीची रीएन्ट्री घरात झाली आहे. तिला घरात पुन्हा पाहून सदस्य आम्हाला आनंद झालाय असं दाखवत असले तरी चिंताही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.


आता तेजस्विनी वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून परत आलीय की घरात उरलेल्या सदस्यांना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला आठवडाभर रहायला आलीय की आणखी काय कारण याचा अंदाज लागेनासा झालाय. पण हे मात्र नक्की की तेजस्विनी घरात आल्यानं घरातल्या स्पर्धकांना एक कडवी स्पर्धक परत आल्यानं टेन्शन असणार.त्यात तेजस्विनीचं फॅन फॉलोइंग तगड झालंय अन् तिचे समर्थकही प्रेक्षकांमध्ये जास्त आहेत त्यामुळे संभाव्य विजेत्यांच्या फायनल लिस्टमध्ये तिलाही पाहिलं जाणार हे निश्चित. आजच्या भागात कदाचित यामागचं गुपित समोर येईलच की तेजस्विनी वाइल्ड कार्ड एन्ट्री आहे की नाही? तोपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने