मनीष मल्होत्राची बर्थ डे पार्टी अन् रेखा नवरीसारखी सजली... मग काय चर्चाच रंगली!

मुंबई: बॉलिवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने 5 नोव्हेंबरला त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी मनीषने त्याच्या घरी एक मोठी पार्टी दिली, ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूडकरी उपस्थित होते. त्याचवेळी या पार्टीचे व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून चाहते आनंदीत झाले आहे. मात्र या पार्टीत मनीषची नव्हे तर रेखाचीच चर्चा जास्त रंगली आहे.या पार्टीत जवळपास सर्वच बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.सोशल मीडियावर या पार्टीचे काही फोटो शेअर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये रवीना टंडन खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. मात्र रेखा पार्टीत पोहोचली तेव्हा तिचं सुंदर रूप सगळ्यांना भुरळ पाडायला पुरेसे होतं. सर्वात उठून दिसत होती ती एव्हरग्रीन रेखा.रेखाने या पार्टीसाठी सोनेरी रंगाचा अनारकली कुर्ता निवडला होता. ज्याच्या कुर्त्यात गोल्डन गोटा वर्क केलेलं होतं. तिच्या कुर्त्यावर सोनेरी जरीचे वर्क होते. रेखाने सोनेरी रंगाच्या कुर्त्यासोबत हेवी ज्वेलरी मॅच केली. हेवी सोनेरी कानातले आणि नेकपीस सोबतच रेखाने तिला पूर्णपणे पारंपारिक लूक दिसावा यासाठी मांगटिका देखील घातला होता. त्याचबरोबर कपाळावर टिकली आणी मरून रंगाची डार्क लिपस्टिक लावायली होती आणि केसांचा जूडा बनवला होता. ज्यावर गजरा सुंदर दिसत होता.इतकच नाही तर रेखाच्या या सर्व गोल्डन लूकबरोबर तिने उंच टाचांच्या सँडलने सर्वांच लक्ष वेधले. रेखाने या कुर्त्यासोबत मॅचिंग स्ट्रेपी हील्स घातल्या होत्या. ज्यामध्ये टाचांची उंची खूप जास्त होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रेखा अनेकदा पारंपारिक लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधते. यामध्ये ती नेहमीच एव्हरग्रीन दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने