स्पॉन्सर सोडतायत BCCI ची साथ; Oppo झालं आता Byju's अन् MPL चा देखील काढता पाय?

मुंबई: बीसीसीआयचे एकूण मुल्यांकन नुकतेच 91,000 कोटींच्या घरात पोहचले आहे. आयपीएल देखील जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लीग झाली आहे. मात्र याच बीसीसीआयच्या स्पॉन्सर्सनी आपला करार अर्धवट सोडून काढता पाय घेण्याचा सपाटाच लावला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजकांमधील दोन प्रायोजक बायजू (Byju's) आणि एमपीएल स्पोर्ट्स (MPL) यांना बीसीसीआयच्या करारामधून बाहेर पडायचे आहे.जून महिन्यात बायजूने बीसीसीआयसोबचा टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपचा करार नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढवला होता. यासाठी त्यांनी जवळपास 289 कोटी रूपये मोजले होते. आता बायजू कंपनीला बीसीसीआयसोबतचा करार मोडायचा आहे. बीसीसीआयने बायजूला त्यांचा करार मार्च 2023 पर्यंत कायम ठेवण्यास सांगितले आहे.



बीसीसीआय याबाबत म्हणते की, 'बायजूकडून बीसीसीआयला 4 नोव्हेंबर 2022 ला मेल मिळाला आहे. त्यात त्यांनी टी 20 वर्ल्डकप झाल्यानंतर बीसीसीआयसोबतचा करार संपवण्याची विनंती केली होती. आमची याबाबत बायजू सोबत चर्चा झाली आहे आणि आम्ही त्यांना सध्याचा करार हा 31 मार्च 2023 पर्यंत कायम ठेवावा असे सांगितले आहे.' याबाबत बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली आहे.बायजूने 2019 मध्ये ओपोला रिप्लेस करत टीम इंडियाचे प्रायोजकपद आपल्याकडे घेतले होते. याचबरोबर बायजू फिफा वर्ल्डकप 2022 चे देखील प्रायोजक होते. एज्यूटेक कंपनी बायजूने नुकतेच आर्थिक तोट्यामुळे आपल्या 50 हजार कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बायजू पाठोपाठ भारतीय संघाचे किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्स देखील आपला करार केकेसीएल कंपनीकडे हस्तांतरित करायचा आहे. त्यांचा करार हा 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये नायके ला रिप्लेस केले होते. दरम्यान, बीसीसीआयने एमपीएल स्पोर्ट्सला देखील आपला करार 31 मार्च 2023 पर्यंत कायम ठेवण्यास सांगितला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने