शुल्लक कारणाने सोनिया अन् बिग बींमध्ये निर्माण झाला दुरावा

दिल्ली: गांधी आणि बच्चन कुटुंबिय यांचे एकमेकांशी मित्रच नाही तर कौटुंबिक संबंध होते. पण नंतर त्यांच्यात असं काही झालं की, ते एकमेकांचं तोंड बघेनासे झाले. नातं एवढं बिघडण्यामागे नेमकं असं काय घडलं याविषयी बऱ्याच लोकांना उत्सुकता असते.याविषयीचा किस्सा 'Bhartiya's book व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, सोनिया गांधी और में' या ज्येष्ठ पत्रकार आणि माजी एम. पी. संतोष यांच्या पुस्तकात सांगण्यात आला आहे. त्यातून समजतं की, एका लहानशा कारणावरून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. एक मदत सोनिया यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे मागितली, पण ती त्यांनी न दिल्याने सोनिया गांधी फार दुखावल्या गेल्या.काय आहे किस्सा?

राहुल गांधी परदेशात शिकायला असताना, त्यांची फी भरण्यासाठी म्हणून सोनिया यांनी अमिताभ बच्चन यांना मदत मागितली होती. त्यावेळी उत्तरात बच्चन म्हणाले की, "ललित सुरी आणि सतीश शर्मा यांनी पैशांचा घोटाळा केला आहे. काहीही उरलेलं नाही. तरीही मी काहीतरी करतो." त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक हजार डॉलर्सचा चेक सोनियांना पाठवला. पण सोनिया गांधी खूप दुखावल्या होत्या. त्यांनी चेक नाकारला आणि बच्चन कुटुंबियांशी संबंध तोडले.पण या घटनेला आधीच्या बऱ्याच घटनांची पार्श्वभूमी होती. ज्यामुळे या कुटुंबांच्या नात्यात कटुता आणि अविश्वास वाढण्यास सुरूवात झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने