“मुस्लीम मुलाशी लग्न करण्याचा निर्णय ऐकल्यानंतर….” शानवाजबद्दल कळताच काय होती देवोलीनाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया?

मुंबई: गेल्या आठवड्यात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने शानवाज शेखशी लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने अचानक फोटो शेअर करत लग्नाची घोषणा केल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शानवाजला देवाने माझ्यासाठी पाठवलं होतं, असं देवोलीना म्हणते. खरं तर, जेव्हापासून तिने दुसऱ्या धर्माच्या तरुणाशी लग्न करण्याबद्दल पोस्ट केली तेव्हापासून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. पण लग्नाच्या निर्णयाबद्दल तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केलाय.‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना देवोलीनाने तिचं आंतरधर्मीय लग्न, ट्रोलिंग, त्यामुळे आयुष्यावर होणारा परिणाम याबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाच्या निर्णयावर कुटुंबीयांनी कशी प्रतिक्रिया दिली, याबद्दलही देवोलीनाने सांगितलं. ती म्हणाली, “आम्ही दोघेही सज्ञान, जबाबदार आणि स्वतंत्र आहोत. त्यामुळे आमच्या पालकांनी आमच्या निर्णयांवर विश्वास ठेवला आणि आम्हाला आशीर्वाद दिला. आम्हाला आमच्या वेगळ्या धर्मामुळे घरातून कोणताही विरोध झाला नाही आणि अडचणी आल्या नाहीत.”

देवोलीनाने १४ डिसेंबर रोजी अगदी साधेपणाने लोणावळ्यात बॉयफ्रेंड शानवाज शेखशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीची ओळख करून दिली होती. दरम्यान, लग्नानंतरच्या अनेक सेलिब्रेशन व्हिडिओंमध्‍ये देवोलीना शानवाजच्या मिठीत शिरून खूप रडताना दिसली होती. तर, शानवाज तिला सांभाळताना दिसत होता. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, असं विचारलं असता ती म्हणाली, “एक मुलगी म्हणून मी माझ्या आईला सोडून नवीन कुटुंबात जात होते, त्यामुळे मी खूप भावूक झाले होते. खरं तर लग्न ही खूप सुंदर गोष्ट असली तरी तो खूप भावनिक काळ असतो.” सध्या देवोलीना आणि शानवाज एकत्र खूप खूश आहेत. दोघेही अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात एकमेकांबरोबर दिसले होते. शानवाज शेख हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने