आता वाटतं मलाही केसं हवी होती....मी पण...अनुपम असं का म्हणाले?

मुंबई:  FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात 18 डिसेंबर रोजी झाला. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिनाने ट्रॉफी आपल्या नावे केली. या अंतिम सामन्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती खेळाडू म्हणजे स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी...मेस्सीने 36 वर्षांनंतर स्वत:च्या बळावर पुन्हा अर्जेंटिनाचे विश्वविजेते बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. फिफा २०२२ चा वर्ल्ड कप अर्जेटिनानं आपल्या नावावर करताच नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आपला आवडता खेळाडू मेस्सीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू म्हणून मेस्सीचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे.दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मेस्सीच्या जबरा फॅन असलेल्या एका चाहत्यांनं अगदी वेगळ्या पद्धतीने अभिनंदन करण्यासाठी मेस्सीचं पोर्ट्रेट काढताना दिसत आहे. आता यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून आपले मनोगत लिहिले आहे.अभिनेते अनुपम खेर यांनी फिफा विश्वचषक विजेते संघ अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. अभिनेत्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा हेयर टॅटू डोक्याच्या मागच्या बाजूला बनवला जात आहे.त्या व्यक्तीची हेअरस्टाईल पाहून अनुपम खेर यांनी लिहिले की, 'माझ्याकडे केस असते तर मी शप्पथ घेऊन सांगतो की कालची मॅच पाहिल्यानंतर मी पण अशीच हेअरस्टाईल केली असती. जय हो मेस्सी बाबा. काहीही होऊ शकते.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने