राज्यपाल आधीच अडचणीत! आता शेतकरी पुत्राची आमदार बनविण्याची मागणी

बीड : बीडचे श्रीकांत गदळे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. ३५ वर्षीय गदळे हे स्वतः शेतकरी असून केज तालुक्यातील (जिल्हा बीड) दहिफळ या गावचे आहेत. त्यांनी थेट आपल्याला आमदार करण्याची मागणी कोश्यारी यांच्याकडे केली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार करावं, अशी मागणी गदळे यांनी केली आहे. शेतकरी आत्महत्या, तरुणांची व्यसनधिनता, महिलांवरील अत्याचार, कामगारांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी विधान परिषदमध्ये पाठवा, अशी मागणी गदळे यांनी केली आहे.
गदळे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित, "मला राज्यपाल महोदय यांनी आपल्या कोट्यातील १२ जागेपैकी एका जागेवर आमदारकी द्यावी. या पदावर नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधनामधून केवळ १ रुपया प्रती महिना मानधन स्वतःसाठी घेईल आणि उर्वरित रक्कम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करेल. याबाबत मी शंभर रुपयाच्या बाँडवर लेखी देत असल्याचं म्हटलं.वास्तविक पाहता, १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल कोश्यारी अडचणीत आले आहेत. न्यायालयाने आमदार नियुक्तीबाबत निर्बंध घातले आहेत. वास्तविक १२ आमदारांची नियुक्ती मागील दोन वर्षांपासून रखडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने