राजस्थानात भारत जोडो यात्रेदरम्यान शेतकऱ्यांचे आंदोलन; कर्जमाफी...

राजस्थान: राजस्थानच्या अलवरमधील शेतकऱ्यांच्या एका गटाने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान निदर्शने केली. तसेच यावेळी कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. 'शेतकऱ्यांनी तक्रार केली की, राजस्थान सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. एका शेतकऱ्याने म्हटलं की राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं 'कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही. आम्हालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे,"असे आणखी एका शेतकऱ्याने सांगितले.होतं, पण ते काही पूर्ण झालं नाही." 
दरम्यान कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही. आम्हालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे,"असेही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. भारत जोडो यात्रेदरम्यानच शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.भारत जोडो यात्रा 3,570 किमी अंतर कापणार आहे. भारताच्या इतिहासात कोणत्याही भारतीय राजकारण्याने पायी चाललेली ही सर्वात मोठी यात्रा आहे, असा दावा काँग्रेसने आधीच केला होता. राहुल गांधी यांचे उद्दीष्ट पक्षाचे केडर एकत्र करणे आणि तिस्काराचे वातावरण कमी करून सामान्य जनतेला एकत्र करण्याचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने