आली रे आली आता दीपिका पदुकोणची बारी आली; रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’मध्ये साकारणार महिला पोलिसाची भूमिका

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी उचलून धरलं. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. ‘सिंघम अगेन’बाबत रोहित शेट्टीने स्वतः खुलासा केला आहे. ‘सर्कस’ चित्रपटामधील ‘करंट लगा’ गाण्याच्या लाँचिंगदरम्यान रोहितने ‘सिंघम अगेन’बाबत भाष्य केलं. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.रोहितसह रणवीर सिंग, दीपिका पदुकोण ‘करंट लगा’ गाण्याच्या लाँचिंगसाठी पोहोचले होते. यावेळी ‘सिंघम अगेन’मध्ये लेडी सिंघमची भूमिका कोण साकरणार? याबाबत रोहितने स्वतः खुलासा केला आहे. रोहितने केलेली घोषणा ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.रोहित म्हणाला, “लोकांना कुठून ना कुठून तरी माहिती ही मिळणारच. त्यापेक्षी मीच या चित्रपटातील अभिनेत्रीबाबत सांगतो. प्रत्येकवेळी लोक मला विचारतात की लेडी सिंघम कधी येणार? तर ‘सिंघम ३’मध्ये लेडी सिंघमची भूमिकी दीपिका पदुकोण साकारणार आहे.”पुढे रोहित म्हणाला, “दीपिका माझी लेडी कॉप आहे. २०२३मध्ये आम्ही या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करू.” माझ्याशिवाय ‘सिंघम ३’ बनूच शकत नाही असं रणवीर यावेळी म्हणाला. म्हणजेच पुन्हा रणवीर या चित्रपटात दिसणार असल्याचंही समोर आलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने