अक्षयचा राम सेतू ओटीटीवर.. कधी, कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या..

मुंबई : अक्षय कुमारसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. या वर्षात अक्षयचे बरेच सिनेमे फ्लॉप ठरले. त्यापैकी दणदणीत आपटलेला चित्रपट म्हणजे राम सेतू (Ram Setu). या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. परंतु हा चित्रपट ओटीटी वर नक्कीच जोरदार चालेल या विश्वासाने आता राम सेतू ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.अक्षय आणि जॅकलिन यांची प्रमुख भूमिका असलेला 'राम सेतू' 26 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खूप जोरदार चालेल अशी चर्चा होती. तसे दणक्यात प्रमोशन देखील करण्यात आले होते. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा कौल मिळाला नाही. बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट जोरदार आपटला. त्यामुळे अनेकांना हा चित्रपट पाहता आला नाही, परंतु अशा सर्वांसाठी हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहे. येत्या 23 डिसेंबरपासून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी ऑनलाइन उपलब्ध होईल. नुकतीच याची घोषणा अॅमेझॉन प्राइम च्या सोशल मीडिया पेजवरून करण्यात आली.'राम सेतू' चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी अंदाजे 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी ठरला. या चित्रपटाने 100 कोटी रुपये कमावले त्यामुळे निर्मितीचा खर्चही हा चित्रपट वसूल करू शकला नाही. आता ओटीटी वर हा चित्रपट काय जादू दाखवतोय ते कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने