Samsung कंपनीने टेक्नॉलॉजीत गाठली नवी उंची! लवकरच आणणार Finger Print स्कॅनरबाबत नवं अपडेट

मुंबई : सॅमसंग आणत असलेल्या नव्या टेक्नॉलॉजीची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. गेल्या काही वर्षापासून आपण असे अँड्रॉईड फोन्स वापरत आहोत ज्यामध्ये ठसे स्कॅन केल्यानंतर स्मार्टफोन अनलॉक होतो. स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी स्मार्टफोनच्या डिस्प्लेजवळ एका खास जागी फिंगरटिप असते. मात्र आता यापुढे जात तंत्रज्ञानानं आणखी उंची गाठली आहे. सॅमसंगनं हे तंत्रज्ञान आणखी विकसित केल्याचा दावा केला आहे.इंटरनॅशनल मीटिंग ऑफ डिस्प्ले इन्फॉर्मेशननुसार सॅमसंगने  आपल्या ऑल-इन-वन ओलेड 2.0 डिस्प्ले आणण्याची घोषणा केली आहे. या प्लान अंतर्गत सॅमसंग नव्या पिढीच्या स्मार्टफोनमध्ये OLED 2.0 ऑल-इन-वन फिंगरप्रिंट सेंसिंगवर काम करत आहे.



काय आहे सॅमसंगची नवी टेक्नॉलॉजी?

गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या OLED डिस्प्लेवर एकानंतर एक काही फिंगरप्रिंट स्कॅन करण्याची क्षमता असणार आहे. या तंत्रज्ञानानुसार पूर्ण स्क्रिनवर कुठेही टच केलं की अनलॉक होणार आहे. हे तंत्रज्ञान फिंगरप्रिंटच्या तुलनेचे सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.सॅमसंगचं नवं तंत्र कधीपर्यंत स्मार्टफोनमध्ये येईल याबाबत माहिती नाही. मात्र ओपीडी (ऑर्गेनिक फोटो डायोड) मल्टी-फिंगरप्रिंट स्कॅनिंग तयार झालं आहे. हे नवं तंत्रज्ञान 2025 ला लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने