पहिली कमाई ७५ रुपये, आज करोडो छापतोय, वाचा सलमानची दबंग स्टोरी

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून जो केवळ बॉक्सऑफिसवर नाही तर सर्वसामान्य चाहत्यांच्या मनावरही राज्य करतोय अशा बॉलीवूडच्या भाईजानचा आज ५७ वा वाढदिवस. अर्थात त्याचा चार्म आणि ऑरा पाहून कोण म्हणेल हा साठीला आलाय. त्याच्यासारखा तोच. सलमान खान बी टाऊनचा एक असा सितारा आहे जो लहान-थोर सगळ्यांनाचा त्याचा चाहता बनायला मजबूर करतो. सलमानचा बर्थ डे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी असते. भाईजान सोबत असो वा नसो त्याच्या बर्थ डे चं सेलिब्रेशन मात्र त्याचा चाहता दणक्यातच करतो.सलमान खानचा वाढदिवस बिग बॉसमध्ये वीकेंड का वार एपिसोडला देखील खास अंदाजात साजरा केलेला आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. आज दिवसभरात त्याचे चाहते सोशल मीडियावर सेलिब्रेशनचा पाऊस पाडतील त्याचा आनंद वेगळाच असेल. पण सगळे वाट पाहतात ते सलमाननं स्वतः सेलिब्रेट केलेल्या ग्रॅन्ड पार्टीची. पण अनेकदा सलमान आपले कुटुंबिय आणि खास मित्र-परिवाराच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा करतो.
२७ डिसेंबर १९६५ ला सलमानचा जन्म झाला. आज सलमान त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. आणि त्यांच्यामुळे त्याला हे शक्य झालंय असं अनेकदा त्यानं बोलून दाखवलंय. आता यामध्ये दुमत नाही की सलमान आज इंडस्ट्रीतला सगळ्यात महागडा कलाकार आहे. तो एक आलिशान आयुष्य जगतो. पण कदाचित हे खूप कमी जणांना माहित आहे की बॉलीवूडच्या या दबंग खानची पहिली कमाई ही १०० रुपयांपेक्षा कमी होती.आता हे ऐकून सगळे हैराण होतीलच. पण मिळालेल्या माहितीनुसार,सलमाननेच आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याची पहिली कमाई ही फक्त ७५ रुपये होती. त्यानं मुबंईतील ताज हॉटेलात एका शो मध्ये बॅकग्राऊंड डान्स केला होता. ज्यासाठी त्याला ७५ रुपये मिळाले होते. 'मैनै प्यार किया' या त्याच्या पहिल्या सुपरहिट सिनेमासाठी त्याला ३१ हजार रुपये मानधन मिळालं होतं.

पण बोलतात ना प्रयत्न करत रहा...यश नक्कीच मिळेल...तर आता बघा सलमान कुठं पोहोचलाय. सलमान      आपल्या सिनेमांसाठी कधी लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले तर कधी त्याला त्याच्या अभिनयावरनं टोकलं देखील गेलं. पण त्यानं आपली मेहनत सुरू ठेवली. आज सलमान बॉलीवूडच्या सगळ्यात महागड्या आणि डिमांडिंग स्टारमध्ये गणला जातो.सलमाननं 'मैने प्यार किया','साजन','हम आपके है कौन','करण-अर्जुन','जुडवा','प्यार किया तो डरना क्या','दबंग','बॉडीगार्ड'.'एक था टायगर','बजरंगी भाईजान' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे केलेयत. सलमाननं एका नंतर एक सुपरहिट सिनेमे बॉक्सऑफिसवर देऊन अनेक नवीन रेकॉर्ड कायम केले.

सलमान आज करोडो कमावतोय. अभिनेता होण्याव्यतिरिक्त तो एक उत्तम व्यावसायिक देखील आहे. सलमानचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे,ज्याचं नाव आहे सलमान खान फिल्म्स. सलमानचा स्वतःचा ब्रान्ड देखील आहे, जो बीइंग ह्युमन नावानं प्रसिद्ध आहे. या सगळ्याच माध्यमातून सलमान तगडी कमाई करतो. याव्यतिरिक्त ब्रॅन्ड एंडोर्समेंटमधनं देखील तो करोडो कमावतो.सलमान बॉलीवूडचा असा स्टार आहे की ज्यानं अनेकांना सढळहस्ते मदत केली आहे,आणि त्यांच्या आयु्ष्यात आनंद भरला आहे. सलमानला फक्त त्याच्याच नावानं नाही तर 'भाईजान' आणि 'दबंग खान' नावानं ओळखला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने