बिग बॉस मराठीची ट्रॉफी कुणाकडे जाणार? ही चार नावं फायनल..

मुंबई: बिग बॉस मराठीचा हा शो चांगलाच गाजत आहे. हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आता हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनी अनेक राडे, वाद, भांडणं पाहिली.अगदी किरण- विकास सारखे मित्र एकमेकांच्या कट्टर विरोधात जातानाही पाहिले त्याचबरोबर राखी आल्यानंतर शोमध्ये रोजचं काही तरी वेगळं पाहिला मिळालं. 80 हून अधिक दिवस घरात एकत्र राहिलेले ही सदस्य काही दिवसातच बिग बॉसचा खेळ जिंकून आपल्या घरी जाणार आहेत.आता हा स्पर्धक कोणं असणार याकडे प्रेक्षकाच्या नजरा लागल्या आहेत.त्यातच आता यंदाच्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची तारीखही जाहीर झाली आहे. ८ जानेवारीला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा आहे. आता घरात राखी सावंत, आरोह वेलणकर, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, हे सदस्य राहिले आहेत. आरोह वेलणकर हा तर घरातला कॅप्टन झाला आहे त्यामूळं तो नॉमिनेशनच्या बाहेर आहे. नॉमिनेशन बाबत बोलायचं झालं तर प्रसाद, अमृता आणि राखी हे तिघेही नॉमिनेट झाले.तर दुसरीकडे किरण माने, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर हे सदस्य सेफ झाले त्यामूळं आता हे चौघेजण बिग बॉसच्या घरातील टॉप चार फायनलिस्ट ठरले. आता या बिगबॉसला त्याचा चार जणांपैकी एक व्यक्ती या पर्वाचा विजेता असेलं. यात अपूर्वा नेमळेकरचं पारडं जड वाटतं असल्यानं कोणाला प्रेक्षकं मत देवून जिंकवतील याकडे सर्वाचें लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने