मोदींच्या जिगरी दोस्तानं केली सरकार स्थापनेची घोषणा; 38 दिवसांनी मिळवलं मोठं यश!

इस्रायल: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी रात्री उशिरा सरकार स्थापनेची घोषणा केलीये. नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांना सांगितलं की, '38 दिवसांच्या युतीच्या चर्चेनंतर आम्हाला सरकार स्थापन करण्यात यश आलंय.'या घोषणेनंतर नेतन्याहू आता इस्रायल सरकारचे प्रमुख म्हणून परतणार आहेत. "गेल्या निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या प्रचंड जनसमर्थ्याबद्दल धन्यवाद, मी सर्व इस्रायली नागरिकांच्या फायद्यासाठी काम करणारं सरकार स्थापन करू शकलो," असं नेतान्याहू यांनी ट्विट केलंय.
बुधवारी मध्यरात्री डेडलाइनच्या काही वेळापूर्वी, नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांना फोन करून सरकार स्थापनेची माहिती दिली आणि घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, नेतन्याहू यांनी सरकार स्थापनेचा आदेश संपण्याच्या 20 मिनिटं आधी ही घोषणा केली. पुढच्या आठवड्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं नेतान्याहू यांनी सांगितलं. मात्र, शपथविधीची तारीख लगेच जाहीर करण्यात आलेली नाहीये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने