ख्रिसमसला मोज्यांमध्ये भेटवस्तू का दिल्या जातात?

मुंबई: डिसेंबरच्या सुरूवातीपासून लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सिक्रेट सांताची चाहूल लागण्यास सुरूवात होते. अनेकजण डिसेंबरच्या सुरूवातीपासूनच या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतात.ख्रिश्चन समुदायाचा हा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी जगभरातील लोक प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये जातात. तसेच अनेकजण सिक्रेट सांता बनून अनेकांना गिफ्ट देतात. ख्रिसमसला गिफ्ट वाटण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. आज आम्ही ख्रिसमसला मोज्यांमध्येच का गिफ्ट दिले जाते आणि सिक्रेट सांता कोण होता याची कहाणी सांगणार आहोत.
ख्रिसमसच्या दिवशी मोज्यांमध्ये गिफ्ट ठेवून सिक्रेट सांता निघून जातात अशी धारणा शतकानुशतके चालत आलेली आहे. लोककथेनुसार, फारपूर्वी आशिया मायनरमधील मायरा नावाच्या ठिकाणी सेंट निकोलस नावाचा एक माणूस राहत होता. ही व्यक्ती खूप श्रीमंत होती. पण त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. संत निकोलस नेहमी गरीबांना मदत करत. मात्र याची माहिती कोणालाच नव्हती. निकोलस अनेकदा गरीबांना सिक्रेट गिफ्ट देऊन खूश करण्याचा प्रयत्न करत असे.एके दिवशी सेंट निकोलसला कळले की, एका गरीब व्यक्तीकडे त्याच्या तीन मुलींच्या लग्नासाठी पैसे नाहीत. त्यानंतर निकोलस त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी रात्री त्याच्या घराच्या छतावरील चिमणीजवळ पोहोचला आणि तेथे पैशांनी भरलेली पिशवी ठेवली. याठिकाणी गरीब व्यक्तीने त्याचे मोजे वाळवण्यासाठी ठेवले होते.

ज्यावेळी गरीब व्यक्ती मोजे घेण्यासाठी छतावर पोहोचली त्यावेळी त्याला मोज्यांमध्ये त्याला भरपूर पैसे ठेवलेले दिसले. असे सांगितले जाते की, जेव्हा निकोलस सोन्याने भरलेली पिशवी घेऊन शेवटच्या वेळी त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्या गरीबाने निकोलसला पाहिले. पण निकोलसने त्याला हे कोणालाही सांगू नकोस असे सांगितले. त्यानंतर ज्या कुणाला गिफ्ट मिळायचे त्यावेळी हे गिफ्ट सिक्रेट सांताने दिल्याचे सांगितले जायचे. मात्र, ही गोष्ट फार काळ लपून राहिली नाही.त्यानंतर इंग्लंडमध्ये प्रथमच निकोलसला फादर ख्रिसमस आणि ओल्ड मॅन ख्रिसमस असे नाव देण्यात आले. तेव्हापासून ख्रिसमसच्या दिवशी सीक्रेट सांता मोज्यांमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा जगभर सुरू झाल्याचे मानले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने