'यामुळे'च त्यांना तालिबानी म्हणतात, आता विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणींना...

अफगाणिस्ताना : अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अफगाणिस्तानात दररोज तालिबानचा हुकूम जारी केला जातो. आता अफगाणी मुलींना विद्यापीठात शिक्षणासाठी अनिश्चित काळासाठी बंदी घालणारा नवा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.उच्च शिक्षणमंत्र्यांच्या पत्रानुसार तालिबानने अफगाणिस्तानातील तरुणी आणि महिलांसाठी विद्यापीठं बंद करण्याची घोषणा केली आहे. उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी मंगळवारी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले की, पुढील सूचना मिळेपर्यंत महिलांचे शिक्षण स्थगित करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे तुम्हा सर्वांना कळविण्यात येत आहे.उल्लेखनीय म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानातील हजारो मुली आणि महिलांनी विद्यापीठांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. त्यानंतर लगेचच आदेश आला. या नव्या फर्मानानंतर अफगाणिस्तानातील हजारो मुलींचं भविष्य अंधकारमय होणार हे स्पष्ट आहे.

याआधी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर महिला आणि तरुणींच्या शिक्षणासंदर्भात फर्मान काढलं होतं. मुलांच्या शाळांमध्ये मुलींना शिक्षण घेता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. तसेच, महिला शिक्षिक मुलींना शिकवू शकतील, फर्मान होतं. या व्यतिरिक्त तालिबानने जिममध्ये जाण्यास महिलांना बंदी घातली होती. वर्षभरापूर्वी तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून स्त्रियांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा ताजा हुकूम आहे. तालिबानच्या या आदेशाविरोधात महिलांनीही निषेध नोंदवला आहे. वेळोवेळी त्यांनी आंदोलनेही केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने