गोकुळचे दूध पुन्हा महागले, गायीच्या दुधात 3 रुपयांची वाढ

मुंबई: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी गॅस आणि घरगुती गॅस दरवाढीनंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर 3 रुपये इतकी वाढ केली आहे. गोकुळ दूध वितरण संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.



गोकुळने ही दरवाढ मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये केली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळ दूध वितरण संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात आतापर्यंत तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही दरवाढ केली आहे.गोकुळने गायीच्या दूधामध्ये लिटरमागे 3 रुपयांची तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, आजच्या दरवाढीमुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे. गोकुळ ब्रँडच्या फुल क्रिम दुधाच्या ग्राहक दरात बदल करण्यात आलेला नाही. .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने