अखेर अटीशर्तीसह अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई : अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. गेल्या 13 महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जातमूचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा केला आहे. तर देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने