भाजपचं ठरलं! 'हा' नेता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; मोदी-शहांनी...

गुजरात:  गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विविध नावं चर्चेत होती.पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने