'हिंदू असतो तर माझं नाव...' शाहरुखनं विषय संपवला की पुन्हा नवा वाद?

मुंबई:   किंग खान शाहरुखच्या मागे लागलेला पठाणचा वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. पण हरेल तो शाहरुख कसला त्यानं आता यासगळ्या वादावर दिलेली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो पुन्हा लाईमलाईटमध्ये आला आहे. दीपिकासोबत बिकीनीमध्ये डान्स करुन शाहरुख वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.सोशल मीडियावर गेल्या आठवडाभरापासून पठाण आणि बेशरम रंग गाण्यावरुन नुसता धुराळा उडाला आहे. दीपिकानं परिधान केलेली बिकीनी त्याला राजकीय, धार्मिक अर्थ जोडला जात असल्यानं नेटकऱ्यांनी शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. याबाबत तर मध्यप्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्रमकपणे आपले विचार मांडले आहेत. जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अपमान केला जात आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. शाहरुखच्या चित्रपटाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही.मिश्रा यांच्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. आता तर आणखी दोन ते तीन दिवसांनी पठाणमधील चित्रपटातील जे दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे त्यावरुन देखील वेगवेगळे प्रश्न नेटकरी विचारु लागले आहे. यासगळ्यात सोशल मीडियावर शाहरुखनं नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांसाठी खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं आपण जर हिंदू असतो तर यासगळ्या गोष्टी झाल्या असत्या का असा प्रश्न किंग खाननं उपस्थित केला होता. सोशल मीडियावर जे काही व्हायरल होते आहे त्यावरुन चाहत्यांना विचार करण्याची सवय लागली आहे. जी चुकीची आहे.

शाहरुखनं यावेळी आपलं नाव जर हिंदू धर्मातील असते तर काय झाले असते असं सांगून पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात करुन दिली आहे. तसं असते तर परिस्थिती माझ्यासाठी बदलली असती का...असे विचारुन राज्यकर्त्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. अर्थात तो व्हिडिओ शाहरुखच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. माझं नाव शेखर राधा कृष्ण असे असते तर...शाहरुखनं असे सांगताच उपस्थित प्रेक्षकांनी त्याला उस्फुर्त दाद दिल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने