विराट कोहली अनुष्कासोबत व्हेकेशनवर, संघाची घोषणा होताच गाठले मुंबई विमानतळ

मुंबई: श्रीलंकेविरूद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतेच संघाची घोषणा केली. विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना टी 20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान, विराट कोहलीने टी 20 मालिकेतून ब्रेक मागितला होता अशी बातमी आली होती. आता हा ब्रेक मोठा आहे की फक्त श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेपुरता आहे हे येणारा काळच ठरवले.

काल (दि. 27) रात्री उशिरा संघाची घोषणा झाली अन् आज सकळी विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. हे दोघेही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हॉलिडेवर जात आहेत. विराट कोहली श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे हा हॉलीडे वनडे मालिकेपूर्वी संपणार आहे.विराट कोहली बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यानंतर तो मुंबईमधील आपल्या घरी परतला. आता अनुष्का आणि विराट व्हेकेशनसाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. बुधवारी त्यांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले.विराटप्रमाणे भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील वनडे मालिकेपूर्वी व्हेकेशनवर गेला आहे. रोहित शर्मा आपल्या मुलीचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करणार आहे. रोहित शर्मा आधीच मालदीवमध्ये पोहचला आहे. रोहितच्या मुलीचा वाढदिवस 30 डिसेंबरला असतो. रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत मंगळवारीच मुंबईहून मालदीवसाठी रवाना झाला होता. श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने