आम्हाला वाचवा ! - रोहिंग्यांचा आक्रोश

मुंबई : रोहिंग्या शरणार्थींचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. निरनिराळ्या प्रकारे स्थलांतर करणारे रोहिंग्या या प्रवासादरम्यान मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक 160 प्रवाशांनी भरलेली नाव आता, भारतीय समुद्रसीमेजवळ आली आहे. द क्विंटच्या एका वृत्तानुसार या नावेतील 160 रोहिंग्या शरणार्थी आणि निर्वासितांची कहाणी जाणून घेतली.




  • गेल्या दहा दिवसांत बोटीवरील कुणीही, काहीही खाल्लेलं नाही.

  • समुद्रात अडकलेल्या रोहिंग्या शरणार्थींची बोट आता भारतीय समुद्रात

  • नवीन GPS निर्देशांकानुसार, ही नाव आता भारतीय समुद्राजवळ असल्याचे दिसते. ती निकोबारच्या कॅम्पबेल खाडीपासून अंदाजे 150 किमी अंतरावर आहे.

    समुद्रात भरकटलेल्या रोहिंग्या शरणार्थींच्या नावेवरील कप्तानाशी झालेल्या संवादात वरील ह्दयद्रावक माहिती समोर आली.

'आमचा जीव चालला आहे. मलाक्का सामुद्रधुनीतून आणि बंगालच्या उपसागरात आम्ही वाहून गेलो आहोत.''

रोहिंग्या शरणार्थींच्या समुद्रात भरकटेल्या नावेवरचा कप्तान केविलवाण्या आवाजात सांगत होता. या नावेत साधारण 160 रोहिंग्या निर्वासित आहेत.हा फोन 18 डिसेंबर रोजी बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील रोहिंग्या निर्वासित रेझुवान खान यांच्याबरोबर झाला. रेझुवान खान यांची बहिण तिच्या पाच वर्षांच्या मुलीसह या बोटीवर आहे.जीपीएीनुसार ही नाव आता भारतीय समुद्रीसीमेजवळ अंदमान आणि निकोबारच्या कॅम्पबेल खाडीपासून अंदाजे 150 किमी. अंतरावर आहे.5 नोव्हेंबर रोजी बांगलादेशहून मलेशियासाठी बोट निघाली आणि 1 डिसेंबर रोजी इंजिनमध्ये बिघाड झाला.

ही बोट अंदमान समुद्रात अडकली. भरकटली आणि मग अंदमान समुद्रातून ते मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत प्रवाहाने वाहून गेले आणि रेझुवानच्या सांगण्यानुसार आता ही बोट भारतीय समुद्रसीमेजवळ आहे.अन्नपाणी नसल्याने जहाजावरील लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळेच हे शरणार्थी, मानवाधिकार कार्यकर्ते, संघटना तसेच युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज (UNHCR) या सगळ्यांनी या निर्वासितांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहेत.परंतु सरकारकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही मदतकार्याविषयीची माहिती अद्याप मिळालेली नाही.

इंडोनेशियातून मदतीचा प्रयत्न झाला पण...

रेझुवानने फोनवर कप्तानाला विचारले, तुमचे मोबाइल स्विच ऑफ का आहेत?त्यावेळी कप्तान म्हणाला, “आमचा जीव जातो आहे. मलाक्का सामुद्रधुनीतून प्रवाहाने आम्हाला बाहेर काढले आहे.”त्यानंतर रेझुवानने कप्तानाला विनंती केली, कृपा करून मोबाइल बंद करू नका कारण तीन दिवस झाले आहेत आणि बोटी तुम्हाला शोधत आहेत.त्यावेळी रेझुवान म्हणाला, "इंडोनेशियातून आम्ही दोन लहान बोटी पाठवल्या होत्या पण दुर्दैवाने त्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत त्यांना शोधू शकल्या नाहीत. आता ही शरणार्थींची नाव भारतीय समुद्रसीमेजवळ आहे. आम्हाला भारतीय नौदलाची मदत हवी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने