3 मध्ये 'व्हिलन' होतो का? रॉकीच्या चाहत्यांचा प्रश्न, हार्दिकचं जबरी उत्तर

मुंबई: बॉलीवूडच्या चित्रपटांना मोठा धक्का देणारा चित्रपट म्हणून केजीएफची ओळख आहे. त्याच्या दोन्ही पार्टला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आता तिसऱ्या भागाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा हार्दिक पांड्या आणि रॉकी भाईचा फोटो व्हायरल झाला आहे.हार्दिकनं शेयर केलेल्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रॉकी भाईसोबत हटक्या स्टाईलमध्ये हार्दिकनं शेयर केलेला तो फोटो चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतो आहे. चाहत्यांनी आता हार्दिकला केजीएफचा व्हिलन होण्याचा आग्रह केला आहे.पांड्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

चाहत्यांचे प्रेम आणि केजीएफच्या स्टारसोबत फोटो यामुळे तो भलताच आनंदात आहे. त्यानंही चाहत्यांच्या कमेंटसवर उत्तर दिले आहे. संधी मिळाल्यास....सर्वांना मनपूर्वक धन्यवाद म्हणायला तो विसरलेला नाही.केजीएफ मधल्या रॉकी भाईसोबत हार्दिकचा तो फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, वा क्या बात है, किती सुंदर फोचो आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, केजीएफ २ मध्ये व्हिलन हो म्हणजे आणखी डबल धमाका आम्हाला पाहायला मिळेल.केजीएफ ३ ची उत्सुकता कायम....

रॉकी म्हणून आता यशला नवी ओळख मिळाली आहे. त्यातून त्याला मिळालेली लोकप्रियताही मोठी आहे. यासगळ्यात केजीएफच्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर देखील केजीएफनं कमाल केली होती. दरम्यानच्या काळात यशनं बॉलीवूड आणि टॉलीवूडवर केलेले भाष्यही चर्चेत आले आहे.जानेवारीमध्ये यशचा बर्थ डे आहे. त्याच्या जन्मदिवसाची फॅन्स आतुरतेनं वाट पाहत आहे. त्यानिमित्तानं यश त्याच्या आगामी केजीएफ ३ विषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे. यासगळ्यात हार्दिक पांड्याच्या पोस्टनं लक्ष वेधून घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने