तुम्ही केलं तर 'लस्ट स्टोरी', आम्ही केलं की 'गंदी बात'! एकता भडकली

मुंबई: टीव्ही मनोरंजन विश्वाची क्वीन म्हणून एकता कपूरचे नाव घेतले जाते. अवघ्या काही वर्षात तिनं या माध्यमावर स्वताच्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. एकता ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. एकतानं बोल्ड कंटेट तयार करुन तो सादर केल्यानं तिच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.ओटीटी माध्यमावर एकता कपूरची इमेज ही काही दिवसांपासून वेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट होताना दिसते आहे. त्यावरुन आता एकतानं प्रतिक्रिया दिली आहे. अल्ट बालाजीच्या प्लॅटफॉर्मवर ज्या मालिका प्रदर्शित झाल्या त्यातून अश्लीलतेचा प्रचार आणि प्रसार होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरुन एकतानं रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे. तिच्या XXX नावाच्या मालिकेन वेबविश्वात खळबळ उडवून दिली होती. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयानं देखील मालिकेवर ताशेरे ओढले होते. निर्मात्यांना फटकारले होते.अशाप्रकारच्या मालिका या युवा पिढीला भरकटवत आहेत. असे निरीक्षण कोर्टानं नोंदविले होते. एकतानं इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे.त्यामध्ये तिनं तुम्ही काही केलं तर ती लस्ट स्टोरी आणि आम्ही केलं की गंदी बात, असे म्हटले आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये कुणाचे नाव घेतले नसले तरी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिची ही पोस्ट बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरवर असल्याचे म्हटले आहे. अप्रत्यक्षपणे तिनं करणवर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.करण जोहरनं लस्ट स्टोरीजची निर्मिती केली होती. त्या चित्रपट मालिकेला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मालिकेला रेटिंगही चांगले मिळाले होते. याउलट एकता कपूरच्या गंदी बात वर वेगळाच शिक्का बसला होता. आऊटलूकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एकतानं पुन्हा एकदा तिची परखड भूमिका मांडली आहे.त्यात ती म्हणते, मला कायम महिलांच्या बाजुनं बोलते असे म्हटले जाते मात्र त्यामागील माझी भूमिका कुणी समजून घेत नाही. आपल्या देशात महिलांच्या हातात रिमोट असते. अशावेळी त्यांच्यासाठी कोणता कंटेट द्यायचा हे आपल्याला चांगले माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने