जिथे तिथे AI चीच चर्चा! गुगल IIT मद्रासला रिसर्चसाठी देणार 'एवढे' कोटी

मद्रास: दिग्गज टेक कंपनी गुगलचा भारतात मोठा इव्हेंट पार पडला आहे. Google For India 2022 इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने इव्हेंटमध्ये नवनवीन फीचर्स आणि प्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुगल आयआयटी मद्रासला तब्बल ८.२५ कोटी रुपये अनुदान म्हणून देणार आहे.Google For India 2022 इव्हेंटमध्ये कंपनीने या अनुदानाची घोषणा केली आहे. यामुळे आयआयटी मद्रासचा समावेश आता स्टॅनफोर्ड आणि एमआयटी सारख्या संस्थांच्या यादीत झाला आहे. गुगल आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर (AI) रिसर्च करण्यासाठी संस्थेला १ मिलियन डॉलर म्हणजे ८.२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान देणार आहे. या अनुदानाद्वारे भारतातील पहिले मल्टी-डिसिप्लेनरी सेंटर स्थापन केले जाईल.गुगल एआयवरील रिसर्चसाठी प्रोत्साहन देत आहे. नवीन रिसर्च सेंटरमुळे संशोधक, तज्ञ, डेव्हलपर्स, कम्यूनिटी मेंबर्सला एक व्यासपीठ निर्माण होईल.आयआयटी मद्रासच्या रोबर्ट बॉश सेंटर फॉर डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे प्रमुख बी. रविंद्रन म्हणाले की, मल्टी-डिसिप्लेनरी हे या सेंटरचे वैशिष्ट्ये असेल. यामुळे एआयबाबत भारतातील संशोधनास मदत होईल. सध्या सरकार आणि उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्ये आधीपासूनच एआयचा वापर केला जात आहे. भविष्यात याच्याआधी अधिक लोक जोडली जाते. यामुळे नवनवीन संशोधन करता येईल.

रवींद्रन म्हणाले की, या सेंटरसाठी गुगल पुढे आले आहे. गुगलप्रमाणेच इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी मद्रास आयआयटीच्या या सेंटरमध्ये रस दाखवला आहे. एवढेच नाही तर नीति आयोगाने देखील यात रस दाखवला आहे. सरकारी कामे व उद्योग जगतात एआयचा वापर वाढला आहे. एआयबाबत अनेक वाद देखील समोर येत आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये कायदे लागू करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. मात्र, पुरेसा डेटा नसल्याने निष्पक्षतेबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने