चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का, मुलीच्या पॅनलचा दारूण पराभव

जळगाव: राज्यात ग्रापंचायत निवडणुकांचे निकाल जाहिर झाले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपुर्वी देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल पार पडला यामध्ये धक्कादायक निकाल लागला आणि गुजरातचं मैदान चंद्रकांत पाटलांनी मारलं. ते पण सगळे रेकॉर्ड तोडून भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं.मात्र गुजरात निवडणुकीत महत्त्वाची भुमीका बजावणारे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (सीआर पाटील) यांची कन्या भाविनी पाटीलला ग्रामपंचातीच्या रिंगणात पराभवाचा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात मोहाडी गावात आपले ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढवली होती.मात्र या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या नेतृत्वात उभा असलेल्या पॅनेलला धक्का बसला आहे. भाविनी पाटील या मागील ५ वर्षे मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावात समाधानकारक विकास केला आणि गावामध्ये विश्वास प्रस्थापित केला.मात्र यावेळी सरपंचपद महिला एसटी कॅटेगरीसाठी राखीव होतं. त्यामुळे भाविनी पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अर्ज भरला होता. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाविनी पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने