ज्योतिरादित्य सिंधिया 24 कॅरेटचे शुद्ध गद्दार; काँग्रेसची जहरी टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय वादाला तोंड फोडलं आहे. सिंधीया काँग्रेसमध्ये परतणारा का या प्रश्नावर जयराम रमेश यांनी वादग्रस्त टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सिंधिया यांना नागरी उड्डाण मंत्रालयाचं खातं मिळालं आहे. जयराम रमेश म्हणाले की, सिंधिया हे २४ कॅरेट शुद्ध गद्दार आहेत. त्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रश्नच येत नाही. दोन वर्षांपूर्वी सिंधिया यांनी काँग्रेस पक्षात बंड करून भाजपमध्ये प्रवेश केला.काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेशात आहे. यावेळी जयराम रमेश म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून मौन धारण करणाऱ्या कपिल सिब्बल यांना पक्षात परतण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. मात्र सिंधिया आणि हिंमता बिस्वा सरमा यांच्यासारख्या लोकांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही. सिंधिया हे २४ कॅरेटचे देशद्रोही आहेत. तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांना पुन्हा संधी दिली जावू नये, असं माझं मत असल्याचही रमेश यांनी नमूद केलं.दरम्यान, रमेश यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मध्य प्रदेशचे भाजपचे सचिव रजनीश अग्रवाल म्हणाले की, सिंधिया मजबूत सांस्कृती वारसा लाभलेले 24 कॅरेटचे देशभक्त आहेत. सिंधिया आणि सरमा या दोघांचीही त्यांच्या कामाशी "24 कॅरेट" वचनबद्धता आहे. रमेश यांची टीका "असंस्कृत" आणि "पूर्णपणे लोकशाहीविरोधी आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी २०१५ मध्ये राहुल गांधी यांच्या 'गैरव्यवस्थापना'ला पक्षाच्या निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आधी केंद्रीय मंत्री आणि नंतर आसामचे मुख्यमंत्री झालेले सरमा फायरब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. तर सिंधिया यांनी 2020 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने